बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (18:54 IST)

'हे मत जिहाद नाही का', महाराष्ट्रात मदरसा शिक्षकांचे पगार वाढले; उद्धव ठाकरे गटाने सोडले टीकास्त्र

sanjay raut
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकार सर्वच घटकांना खूश करण्यात व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी मदरसा शिक्षकांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पण सरकारच्या या निर्णयावर राजकीय हल्लाबोल सुरू झाला असून शिवसेना युबीटीने शिंदे सरकारवर मत जिहाद केल्याचा आरोप केला आहे.
 
महाराष्ट्रात शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदरसा मध्ये डी.एड, बी.एडसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. शिक्षकांच्या पगारवाढीच्या निर्णयाचाही यामध्ये सहभाग आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राजकारण चांगलेच तापले असून शिवसेना युबीटीने या निर्णयावर निशाणा साधत हा मतदान जिहाद तर नाही ना, असा प्रश्न विचारला आहे.   
 
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रश्न उपस्थित केला की, मदरसा शिक्षकांचे मानधन आणि पगार वाढवण्याचा निर्णय 'मत जिहाद' नाही का? तसेच ते म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा मौलाना आझाद फायनान्शियल कॉर्पोरेशनचे भागभांडवल 700 कोटींवरून 1,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणे यासारख्या योजना निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून राबवल्या जात आहे.  

Edited By- Dhanashri Naik