गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑक्टोबर 2024 (09:25 IST)

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नाही-संजय राऊत

sanjay raut
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाच्या विलंबासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. तसेच ते म्हणाले की प्रदेश काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी जागावाटपाच्या दिरंगाईसाठी काँग्रेसला जबाबदार असून प्रदेश काँग्रेसचे नेते निर्णय घेत नसल्याबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली. त्यामुळे जागा वाटपात विलंब होत आहे. शुक्रवारी संजय राऊत म्हणाले की, विधानसभेच्या 288 जागांपैकी 200 जागांवर एकमत झाले आहे, पण अजूनही काही जागांवर निर्णय बाकी आहे.
 
ते म्हणाले, “अनेक जागांवर निर्णय झाले आहे. काही जागांवर निर्णय झालेला नाही. कमी वेळ आहे.महाराष्ट्रातील नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असे मला वाटते. ते अनेकदा दिल्लीला यादी पाठवतात. मग चर्चा होते. वेळ निघून गेली. लवकरात लवकर निर्णय घ्यावा. 
 
तसेच संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मतभेद नाही. काँग्रेसमध्ये असे कोणतेही मतभेद नाही. पण काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. आम्ही काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली. बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरेंना देण्यात आली. 200 हून अधिक जागांवर एकमत झाले असून पण काही ठिकाणी समस्या आहे. संजय राऊत म्हणाले की, आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. भाजपशी कसे लढायचे ते आम्हाला माहीत आहे.