1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Man throws cat from 12th floor in Mumbai

लज्जास्पद! मुंबईत एका व्यक्तीने मांजरीला १२व्या मजल्यावरून धक्का देत खाली फेकले

मुंबईतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. व्हिडिओमध्ये एका मांजराला १२व्या मजल्यावरून खाली फेकण्यात आले आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत अंधाऱ्या रात्री घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आता ती व्हायरल झाली आहे. ही घटना मुंबईतील अंबरनाथ येथे घडली आहे. 
व्हिडिओमध्ये एक माणूस एका कॉरिडॉरमधून सहजपणे चालताना दिसत आहे. त्यानंतर तो बाल्कनीसारख्या ठिकाणी पोहोचतो. अगदी कडेला एक मांजर बसलेले दिसत आहे. पुढे काय होणार आहे याची मांजराला काहीच कल्पना नव्हती. मांजर त्या माणसाकडे पाहते. पण मग तो माणूस  तिला ढकलतो. मांजर १२व्या मजल्यावरून खाली पडते. एक मोठा आवाज ऐकू येतो. त्यानंतर, जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात तो माणूस निघून जातो. माणुसकीला काळिमा फासणारी अशी काही माणसे समाजात वावरतात यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. 
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
Avore Electric EX 260 किमी रेंज आणि 114 किमी प्रति तास वेगासह लॉन्च