1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Manoj Jarange announces decisive agitation for Maratha reservation from August 29

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे कडून २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाची घोषणा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार कडून झालेल्या फसवणुकीच्या विरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट पासून निर्णायक लढाईचा इशारा दिला आहे. 
२९ ऑगस्टपासून आरपारचे आणि अंतिम निर्णायक आंदोलन उभारणार आता तुकडा पाडल्याशिवाय शांत राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आंतरवली सराटी येथून पत्रकार परिषदेत दिला आहे. 
राज्य सरकारने २४ ऑगस्ट पर्यंत हैद्राबाद गॅजेटची अंमलबजावणी करून ५८ लाख नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावी अन्यथा २९ ऑगस्टपासून राज्यातील सकल मराठा समाज रस्त्यावर उतरेल.
५८ लाख कुणबी नोंदी सापडूनही सरकार प्रमाणपत्रे का देत नाही? हैदराबाद गॅझेट लागू केले मग प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ का करत आहे. 
१ ते २९ ऑगस्टदरम्यान समाजातील प्रत्येकाने या लढ्यासाठी पूर्ण वेळ द्यावा आणि एकानेही घरी बसू नये, असे आवाहन त्यांनी केले.
 
मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देण्यास विरोध करणाऱ्या ९ ओबीसी मंत्र्यांची नावे मी २९ ऑगस्ट रोजी जाहीर करेन, असा गौप्यस्फोटही जरांगे यांनी केला
 
Edited By - Priya Dixit
पुढील लेख
LIVE: मनोज जरांगेकडून निर्णायक आंदोलनाची घोषणा