1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (07:39 IST)

पोस्टाच्या तिकिटांची चित्रं असलेले मास्क मुंबई पोस्ट कार्यालयानं बाजारात आणले

Masks
13 ऑक्टोबर हा दिवस जगभरात पोस्ट तिकिट संग्राहक दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी 9 ऑक्टोबर पासून राष्ट्रीय पोस्टल आठवडा पाळण्यात आला असून या दिवसाचे औचित्य साधून मुंबई पोस्ट कार्यालयानं एक खास पोस्टाच्या तिकिटांची चित्रं असलेले मास्क बाजारात आणले आहेत. कोविडच्या काळात एक सुरक्षा उपाय म्हणून या अनोख्या मास्कचा वापर करण्यात येणार आहे. या पोस्ट आठवड्याबद्दल पोस्ट विभागानं दररोज एका पोस्टल सेवेवर कार्यक्रम आयोजित केले आहेत.