मुंबईतील मरीन लाईन्स येथील इमारतीला भीषण आग
मुंबईतील मरीन चेम्बर्स इमारतीला आग लागण्याचे वृत्त समोर आले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईतील 5 मजली मरीन चेम्बर्स इमारतीच्या वरच्या मजल्यावर भीषण आग लागली. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित आहे.
दुपारी 12:25 वाजता शेजाऱ्यांनी मरीन लाईन्स येथील इमारतीला आग लागल्याची माहिती दिली. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे.
आगीचे फोटो ऑनलाईन समोर आले आहे. व्हिडीओ मध्ये काळा धूर निघताना दिसत आहे. स्थानिक लोकांमध्ये घबराहट पसरली आहे. सुदैवाने या मध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
Edited By - Priya Dixit