मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 27 नोव्हेंबर 2024 (17:21 IST)

मुंबईतील डोंगरीच्या बहुमजली इमारतीला भीषण आग, कोणतीही जीवित हानी नाही

fire
मुंबईत दुपारी डोंगरी परिसरातील अन्सारी हाईटसच्या इमारतीच्या 15 व्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जनहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे 5 बम्ब घटनास्थळी पोहोचले सुदैवाने या मध्ये कोणतीही जनहानी झाली नाही. 
 
दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीला आग लागल्याने गोंधळाचे वातावरण पसरले आहे.  
या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,  ज्यामध्ये इमारतीतून उंच ज्वाळा निघताना दिसत आहेत. इमारतीला लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
Edited By - Priya Dixit