शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 27 नोव्हेंबर 2024 (08:44 IST)

मुंबईत भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

accident
Mumbai News :  महाराष्ट्रातील मुंबईमधील विलेपार्ले परिसरात वेस्टर्न एक्स्प्रेसवे हायवे वर मंगळवारी भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर आदळली आणि भीषण अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, कार इतक्या वेगात धडकली की त्यात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ओळख पटवली आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक कौशिक 18 स्थानिक महाविद्यालयात विज्ञान शाखेचा विद्यार्थी आणि जलज धीर 18 बीबीएचा विद्यार्थी अशी मृतांची नावे आहे.