बातमी उपयोगाची, मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Last Modified शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (08:43 IST)
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी २७ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १० वाजता ते दुपारी ३ वाजेर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान धिम्या मार्गावरील सर्व डाउन विशेष उपनगरी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर धिम्या मार्गावरील सर्व अप उपनगरी विशेष सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
तसेच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी डाउन हार्बर मार्गावर सकाळी १० वाजून ४० ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर अप हार्बर मार्गावर सकाळी १० वाजतापासून ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी ११.१५ ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत बंद राहील. तर पनवेल/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील विशेष सेवा सकाळी ९.०५ ते दुपारी ३.४५ या वेळेत बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

जागतिक मराठी भाषा दिवस 2021

जागतिक मराठी भाषा दिवस 2021
दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून ओळखला जातो

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सिद्धीविनायकाचे दर्शन बंद

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सिद्धीविनायकाचे दर्शन बंद
राज्यातली कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर

पुजा चव्हाण प्रकरण, पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा ...

पुजा चव्हाण प्रकरण, पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट यांचा पोलिसात तक्रार अर्ज
पुजा चव्हाण प्रकरणात पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या सून आणि पुणे शहर भाजपच्या ...

आठवले यांच्या पक्षाला मिळाले निवडणुकीसाठी 'हे' चिन्ह

आठवले यांच्या पक्षाला मिळाले निवडणुकीसाठी 'हे' चिन्ह
आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास ...

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वाढविण्याचा प्रयत्न होत ...

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वाढविण्याचा प्रयत्न होत आहे : दरेकर
कोरोनाची काळजी घेत आपल्याला अधिवेशन चालवता येतं, पण सरकारचा पळ काढण्याचा प्रयत्न दिसत