बदलापूरमध्ये अल्पवयीन कर्करोग पीडितेवर बलात्कार, आरोपी तरुणाला अटक
बदलापूर पोलिसांनी 2 मार्च रोजी बदलापूरमध्ये कर्करोगाने ग्रस्त असलेल्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 29 वर्षीय पुरूषाला अटक केली आहे. आरोपीचे नाव सूरज सिंग असे आहे, जो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. पीडितेवर मुंबईतील एका रुग्णालयात केमोथेरपी सुरू होती.
आरोपीने घरी कोणी नसता पीडितेच्या घरात प्रवेश केला आणि बेडरूम मध्ये पीडिता झोपलेली पाहून तिच्यावर अतिप्रसंग केला. आरोपी वारंवार पीडितेवर अति प्रसंग करायचा. गेल्या दीड महिन्यांपासून हे सर्व सुरु होते. या मुळे पीडित मुलगी गर्भवती झाली.
तिची केमोथरेपी झाल्यावर अहवाल तपासल्यावर ती गरोदर असल्याचे उघडकीस आले. डॉक्टरांनी पोलिसांना कळवले नंतर आरोपीच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.
एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
Edited By - Priya Dixit