रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (09:52 IST)

दानशूर, नव्याने उभारलेली १९ माळ्यांची इमारत दिली क्वारंटाइन सेंटरसाठी

मुंबईत एका बांधकाम व्यवसायिकाने नव्याने उभारलेली १९ माळ्यांची इमारत क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी महापालिकेला दिली आहे. मेहुल संघवी असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. “घर खरेदी केलेल्या रहिवाशांसोबत चर्चा केल्यानंतरच आम्ही हा निर्णय़ घेतला. सध्या ही इमारत करोना रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरली जात आहे,” अशी माहिती मेहुल संघवी यांनी दिली आहे. ही इमारत मालाडमधील एस व्ही रोडवर आहे. इमारतीत एकूण १३० फ्लॅट आहेत. इमारतीला राज्य सरकारकडून ओसीदेखील मिळाली आहे. इमारतीमधील फ्लॅट मालकांकडे सोपवण्यासाठी पूर्ण तयार होते.
 
सध्या या इमारतीत एकूण ३०० करोना रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. एका फ्लॅटमध्ये चार रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. यामध्ये मालाडचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीदेखील महत्त्वाची भूमिका निभावली. “फ्लॅट मालकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला,” असं मेहुल संघवी यांनी सांगितलं आहे.