शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत पुन्हा इमारत कोसळली दोघांचा मृत्यू सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले

मुंबई येथे पुन्हा इमारत पडल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील पिराणीपाड्यात शांतीनगर भागात धोकादायक इमारत कोसळली आहे. ही चार मजली इमारतीला तडे गेल्यानंतर रहिवाशांची सुटका करतानाच इमारत पडली साहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ढिगाराखाली पाच ते सहा जण अडकल्याची भीती बचाव पथकाने व्यक्त केली आहे.  
 
शांतीनगर भागातील चार मजली इमारतीचा कॉलम शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हलू लागला होता, त्यामुळे यातील रहिवासी घाबरले होते, साडेनऊच्या सुमारास महापालिका कंट्रोल रुमला फोन गेल्यानंतर रहिवाशांना इमारतीतून सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरु झाले.  मात्र दुर्दैवाने त्याचवेळी सुमारास संपूर्ण इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.  यामध्ये विशेष असे की इमारत केवळ सहा वर्ष जुनी आहे, अर्थात बांधकामाच्या दृष्टीने नवीन इमारत आहे.  या दुर्घटनेत 28 वर्षीय शिराज अन्सारी आणि आकिब या दोघांचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातील काहीना जिवंत बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.