मुंबई ते पुणे सुपर फास्ट : याच महिन्यात मुंबई-पुणे हायपरलूपचे होणार भूमिपूजन

Virgin Hyperloop One
मुंबई| Last Updated: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (16:37 IST)
मुंबईहून अवघ्या ३० मिनिटात पुणे येथे पोहोचायचे स्वप्न पुढील काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार आहे. विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’च्या माध्यमातून ही दोन शहरे केवळ २३ मिनिटांच्या अंतरावर जोडली जाणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील अतिशय महत्त्वाकांक्षी हायपरलूप प्रकल्पाचे याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते याच महिन्यात करण्याची योजना असल्याचे मंत्रालयातील सूतोवाच केले आहे.
मुंबईहून पुणे गाठण्यासाठी एक्स्प्रेस वे वरून साडेतीन तासांचा वेळ लागतो. तर मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेन (किंवा पॉड)ने केवळ २३ मिनिटांत हे अंतर पूर्ण करणार आहे. मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा हा अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. कुर्ला बीकेसी ते वाकडदरम्यान ११७.५० किमी अंतरावर हा प्रकल्प कार्यान्वयीत होणार आहे. जवळपास ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. सोबतच अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च होणार असून या टप्प्यात ११.८० किमी लांबीचा पथदर्शी प्रकल्प बांधण्यात येणार आहेत. यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागेल. तर संपूर्ण प्रकल्पासाठी सहा ते सात वर्षांचा कालावधी लागणार आहे.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

दिल्लीत पोलिसांवर कारवाई, पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका

दिल्लीत पोलिसांवर कारवाई, पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका
ईशान्य दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून हिंसाचार सुरु असून याचा फटका दिल्लीतील पाच बड्या ...

राजस्थानमध्ये लग्नाच्या वर्‍हाडाची बस नदीत कोसळली, 24 ठार

राजस्थानमध्ये लग्नाच्या वर्‍हाडाची बस नदीत कोसळली, 24 ठार
राजस्थानमध्ये लग्नाचं वऱ्हाड घेवून निघालेली एक बस नदीत कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू झाला ...

दिल्ली हिंसाचार थांबवण्याची जवाबदारी अजित डोवाल

दिल्ली हिंसाचार थांबवण्याची जवाबदारी अजित डोवाल
दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ...

दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग: सोनिया गांधी

दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग: सोनिया गांधी
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ ...

'मर्डर'च्या 6 महिन्यानंतरही जिवंत होती शीना बोरा: इंद्राणी ...

'मर्डर'च्या 6 महिन्यानंतरही जिवंत होती शीना बोरा: इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा
शीना बोरा हत्याकांडातील (Sheena Bora Murder) आरोपी इंद्राणी मुखर्जीने आपल्या जामीन ...