'तर' बलात्कार होऊ शकत नाही
दोघांमधील नात्याचे लग्नामध्ये रुपांतर होणार नाही, हे माहीत असूनही परस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार होऊ शकत नाही, असा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. याबाबत कोर्टाने म्हटले आहे की, लग्न होण्याबाबत अनिश्चितता असतानाही एखादी महिला संबंधित पुरुषाबरोबर परस्पर सहमतीने शारीरिक संबंध कामय ठेवत असेल तर ती त्याच्यावर बलात्काराचा आरोप करू शकत नाही.
याच आधारावर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सेल्स टॅक्समधील साहाय्यक आयुक्तपदावरील महिलेची याचिका फेटाळून लावली. या महिलेने सीआरपीएफमध्ये डेप्युटी कमांडंट पदावरील एका अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. ते सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तसेच ते अनेकवेळा एकमेकाच्या घरात राहिले आहेत. यामुळे या दोघांचे परस्पर सहमतीने शारीरिक संबंध होते, हेच स्पष्ट होते, असे कोर्टाने नमूद केले आहे.