मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑगस्ट 2019 (16:16 IST)

उद्धव ठाकरे राज यांच्या मागे उभे आहेत – संजय राऊत

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथील कोहिनूर स्क्वेअर आर्थिक व्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी सुरु आहे. त्यात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे समोर आले असून आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे माध्यमांना सांगितले आहे. राज यांची चौकशी एक परिक्षा असून, त्यातून ते तावून सुलाखून निघतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तर स्वतः राज यांचे बंधू उद्धव ठाकरे देखील या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत, असंही राऊत यांनी सांगितले आहे.
 
संजय राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी भाऊ म्हणून त्यांच्या भावना व्यक्त केल्या असून, त्या फार महत्वाच्या आहेत. राजकारण वेगळ्या बाजूला ठेवले पाहिजे, राजकारणात मतभेद असू शकतात. पण जेव्हा कुटुंबाचा विषय येतो, तेव्हा कुटुंबाचा प्रमुख म्हणून प्रत्येकजण आपआपल्या भूमिका पार पाडत असतो. असे राऊत यांनी सांगितले आहे.