मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मनसे कार्यकर्त्यांचे आत्मथदहन, ई डी चौकशी आधी राज ठाकरे यांनी केली कळकळीची विनंती

मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे वेगेलच नाते आहे. राज यांनी आदेश द्यावा आणि तो त्यांच्या सैनिकांनी  ऐकावा अशी स्थिती आहे. त्यात ई डी ने राज यांना चौकशी साठी आज बोलवले त्यामुळे मनसैनिक संतप्त झाले आहेत. तर एकाने तर आत्महत्या केली आहे. त्यामुळे राज ठाकरे व्यथीत झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी पुन्हा कळकळीची विनंती केली आहे. आपण सर्व संकटाना सामोरे जाऊ तर तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या असे त्यांच्या अधीकृत सोशल मीडिया खात्यावरून त्यांनी आवाहन केले आहे. वाचा काय म्हणत आहेत राज ठाकरे
 
"आपला सहकारी प्रवीण चौगुले ह्याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, ह्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं. प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे. 
 
मात्र कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की असा विश्वास राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
तसेच ईडी सारख्या संस्थांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना मी योग्य ती उत्तरं देईन. तुम्ही सर्वानी शांतता राखा आणि कोणीही उद्या ईडीच्या कार्यालयाच्या जवळ कोणीही येऊ नका. कालच्या माझ्या सूचनेनंतर देखील अनेक जण ईडीच्या कार्यालयाजवळ येण्याचा विचार करत आहेत असं मला कळलं, तुमचं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिथे येणार नाही असं आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
 
तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्या. बाकी ह्या विषयावर जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच. तो पर्यंत तुम्ही सर्वानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या अशी सूचना राज यांनी कार्यकर्त्यांना केली आहे."
 
राज यांना बोलवल्याने मुंबईत आज तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलिसानी सर्व तयारी केली आहे.