शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑगस्ट 2019 (16:19 IST)

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर यतीचे अंबादास दानवे विजयी

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवेसना- भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे विजयी झाले आहेत. दानवे आयांनी आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांचा पराभव केला. अंबादास दानवे यांना 524 मते तर आघाडीचे उमेदवार कुलकर्णी यांना 106 मते पडली. तर एकूण 633 मते वैध ठरली.
 
औरंगाबाद आणि जालन्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (प्रतिनिधिंनी 19 ऑगस्टला या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये झालेल्या या निवडणुकीत नक्की कुणाचा विजय होईल याची उत्सुकता प्रत्येकाला होती. एकूण मतदार 657 इतके होते. यापैकी महायुतीकडे 330, महाआघाडीकडे 250 तर एमआयएम-अपक्ष मिळून 77, मतदार होते.