मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (13:56 IST)

मुंबादेवी, लालबाग आणि… मुंबईच्या 7 स्टेशनचे नाव बदलणार, सरकार कडून मिळाली मंजुरी

lokal
Mumbai Station New Name: मुंबई मधील सात रेल्वे स्टेशनचे इंग्रजी नाव बदलणार आहे. या स्टेशनला आता मराठी नवे देण्यात येणार आहे.
 
महाराष्ट्र सरकार ने गुलामीचा एक निशाण मिटवून टाकण्याची सुरवात केली आहे. या अंतर्गत इंग्रज व्दारा देण्यात आलेल्या मुंबईच्या सात रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात येणार आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्टेशनचे ब्रिटिशकालीन इंग्रजी नावे बदलावी म्हणून अनेक वर्षांपासून मागणी होती. शेवटी ही मागणी आता पूर्ण झाली.
 
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभा मध्ये मुंबईच्या सात रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सादर केला.  या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
 
राज्य सरकारकडून मंजुरी दिल्यानंतर रेल्वे स्टेशनचे नवीन नाव केंद्र सरकारची अंतिम निर्णयासाठी पाठवण्यात येतील. याकरिता लवकरच या सात रेल्वे स्टेशनला इंग्रज व्दारा दिली गेलेली ओळख मिटवण्यात येईल. या रेल्वे स्टेशनला आता मराठी नावे देण्यात येतील.
या ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशनला मिळतील नवीन नावे-
मरीन लाइंस – मुंबादेवी
करीरोड – लालबाग
सैंडहर्स्ट रोड – डोंगरी
डॉकयार्ड – माझगांव
चर्नीरोड – गिरगाव
कॉटन ग्रीन – कालाचौकी 
किंग्स सर्कल – तिर्थकर पार्श्वनाथ