बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (14:43 IST)

मंकीपॉक्सचा धोका पाहता मुंबई महापालिका सावध

कोरोनानंतर आता मंकीपॉक्सच्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे. या मंकीपॉक्सचा धोका पाहता मुंबई महापालिकेने सावध पवित्रा हाती घेतला आहे. यानुसार आता मुंबई विमानतळावर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिवाय विमानतळ अधिकारी परदेशातून आणि मंकीपॅाक्सची साथ असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करतेय.
 
मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आणि 28 बेड्स तयार करण्यात आले आहेत. यानुसार त्यांचे चाचणी नमुने एनआयव्ही पुणे प्रयोगशाळेत पाठवले जातील. मुंबईतील सर्व आरोग्य सुविधांना रूग्णालयांना सांगण्यात आलंय की, कोणत्याही संशयित प्रकरणाची सूचना कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात यावी.