रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (13:51 IST)

आईने 15 दिवसांच्या बाळाला सोडले रस्त्यावर

baby
नवरा- बायकोमध्ये भांडण होतातच. पण आई वडिलांच्या भांडण्यात मुलांचे हाल होतात हे माहितीच आहे. नवरा बायकोच्या भांडणाच्यापायी एका आईने आपल्या 15 दिवसाच्या बाळाला रस्त्यावर सोडून देण्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. 
 
वृत्तानुसार, 6 मे रोजी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणेच्या हद्दीत चौपाटीवर बसस्टॉप च्या अडोळ्याला एका 15 दिवसाच्या चिमुकल्याला अज्ञात व्यक्ती सोडून गेल्याची माहिती मिळाली होती. मरीन ड्राईव्हच्या महिला पोलीस उपनिरीक्षक या तातडीने त्या स्थानी पोहोचून चिमुकल्याला आपल्या ताब्यात घेतले. बाळावर औषधोपचार करून त्याला बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले. या बाळाची आई कोण ? कोणी या चिमुकल्याला सोडले ह्याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरु केले. त्यांनी चर्चगेट, रेल्वे स्टेशन, मरीन लाईन्स, चर्नी रोड, माटुंगा, सायन, कुर्ला , विद्याविहार, मुलुंड, ठाणे, भांडुप, डोंबिवली, कल्याण, खडवली असे सर्व परिसरातील सीसीटीव्ही केमेऱ्याचे फुटेज तपासले असताना त्यांना एका मुलीच्या हातात बाळ असल्याचे आढळले. तिच्या सोबत एक पुरुष देखील होता. चर्च गेट रेल्वे स्टेशन पासूनच हा शोध घेत पोलीस अखेर बाळाच्या आई पर्यंत पोहोचली. ते दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चर्च गेट रेल्वे स्टेशन ला येऊन दादरच्या स्थानकावर उतरून मध्य रेल्वेच्या दिशेने होऊन ट्रेन मध्ये बसले आणि खडवली रेल्वे स्टेशनला उतरून कुठे तरी  निघून गेले. पोलिसांनी अखेर त्यांचा शोध लावला आणि बाळाच्या आई आणि मामा पर्यंत पोहोचली. 
 
त्या दोघांना विचारपूस केल्यावर त्यांनी जे सांगितले ते धक्कादायक होते. बाळाची आईचे नाव सरोज सत्यनारायण सहारण(22) आणि मामाचे नाव राम सेवक यादव (28) असे होते. मुलाची आई मूलतः बिहारची असून तिचा नवरा राजस्थानचा आहे. त्यांनी मुंबईत येऊन लग्न केले आणि एकत्र राहू लागले. मात्र सरोजचा नवरा तिच्या पेक्षा वयाने मोठा आहे आणि नवरा आपल्याला पुढे शिकवणार की नाही अशी भीती तिला वाटत होती. म्हणून तिने आपल्या 15 दिवसाच्या तान्हाल्या बाळाला रस्त्यावर सोडून दिले. पोलिसांनी बाळाच्या आई सरोज आणि मामा रामसेवकला अटक केली आहे.