सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (17:40 IST)

मुंबई एनसीबीकडून मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक

मुंबईतील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. मुंबई अंबली पदार्थ नियंत्रण विभागाकडून करण्यात आलेल्या या करावाईत आणखी कोणाचा समावेश आहे याचाही तपास करण्यात येत असून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे.आहे. त्या मोबाईलद्वारेच आता या प्रकरणातील आणखी काही संशयितांचा शोध घेण्याचे काम एनसीबीकडून सुरु आहे.