मुंबईत 14 कोटींचे चरस जप्त  
					
										
                                       
                  
                  				  मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात चरस-गांजाचे प्रमाण वाढ होत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ७ आणि ६ यांनी मुंबई प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाका येथे २७ किलो चरस जप्त केले आहे. या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
				  													
						
																							
									  
	 
	मुंबई पोलीस गुन्हे शाखा, नार्कोटिक सेल व यांच्याकडून अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यांनी केलेल्या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीमध्ये २ पुरुष व २ महिला सहभाग दिसून आला आहे. हे सर्व आरोपी पवई परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय किंमत १४ कोटी ४४ लाख रुपये आहे.