साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले – मुंबई पोलिस आयुक्त
मुंबईच्या साकीनाका परिसरात संतापजनक घटना घडून आली.या बलात्कार घटनेनंतर मुंबई पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली.यांनतर आता या आरोपीविरोधात पुरावे मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याबाबत त्याने सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. घटनास्थळी पीडित महिला कधी आली?,आरोपी कधी आला? गुन्हा कसा घडला? आणि आरोपी घटनास्थळावरून कसा गेला? याबाबत पुरावे हाती लागले आहेत.तसेच आरोपीकडून शस्त्र जप्त केली असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी माहिती दिली आहे की, आरोपीला 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून त्याच्याविरोधातअॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल केलाय.हा संवेदनशील गुन्हा असल्यानं स्पेशल कौन्सिल आणि वकीलाची नेमणूक केलीय.राजा ठाकरे यांच्याकडे प्रकरण दिलं आहे.तपासात ते देखील मार्गदर्शन करत आहेत.डीएनएचे रिपोर्ट येण्यासाठी कालावधी लागेल तेवढाच अन्यथा तपास 15 दिवसात होऊन जाईल. या गुन्ह्याचे आरोपपत्र एका महिन्याच्या आत दाखल करू,असं आयुक्त नगराळे म्हणाले.
पुढे त्यांनी माहिती दिली आहे की, 2 घटना घडल्या त्या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाच्या काही मेंबर्सनी घटनास्थळी भेट दिली.वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल्ड कास्टच्या सदस्यांनी भेट दिली.