अनाधिकृत तिकीट विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई
अँटी टाऊट स्क्वॉड (एटीएस) आणि मुंबई विभागाच्या वाणिज्य शाखेने आरपीएफच्या मदतीने केलेल्या कारवाईत तब्बल १९ दलालांना अटक करत त्यांच्याकडून ७ लाख २२ हजार किंमतीची ४७५ ई-तिकिटं जप्त करण्यात आली. जानेवारी २०२१ ते १० सप्टेंबर २०२१ या कालावधीत अनाधिकृत तिकीट विक्रेत्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
बोनाफाईड प्रवाशांना आरक्षित तिकिटं उपलब्ध करून देण्याचे प्रकार रोखण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आलीय. सणासुदीच्या कालावधीत हे प्रकार वाढत असल्यानं त्याकडे पथकांनी विशेष लक्ष केंद्रीत केलंय. १० सप्टेंबर २०२१ रोजी पथकाने मुंबईच्या पायधुणी परिसरात असलेल्या नॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स येथे छापा टाकला. त्यात बेकायदेशीर ई-तिकिटिंग खरेदी व्यवसायात सहभागी दोघांना अटक केली. दोघांनीही तशी कबुली दिलीय. त्यांच्याकडून २ कम्प्युटर्ससह मोबाईल आणि १२२ ई-तिकिटं जप्त करण्यात आले. या आरोपींविरुद्ध कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
यापूर्वी २५ एप्रिलला वडाळा (पूर्व), मुंबई येथे केलेल्या तपासणीत ५७ हजारांची ई-तिकिटं जप्त करण्यात आली होती. दुसर्या एका कारवाईत भाईंदर परिसरातून १ लाख ११ हजार किंमतीची १५१ ई-तिकिटं जप्त करण्यात आली होती.