गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (16:19 IST)

बलात्कार प्रकरण: 20 लाखांची मदत

mumbai police
साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तसेच पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहायता निधीतून तसेच शासनाच्या विविध योजनांमधून 20 लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे नेमकं काय म्हणाले?
“दोन दिवसांपूर्वी साकीनाका बलात्कार प्रकरणाबाबत माहिती दिली होती. या प्रकरणी जो तपास समोर आला आहे. त्याबाबत माहिती देणार आहोत. याप्रकरणी सोशल मीडियावर चुकीचा मेसेज पसरवला जातोय. त्यामुळे खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माहिती देतोय”, असं आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केलं.