सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (07:53 IST)

मुंबई पोलिसांनी अरविंद सावंत यांना तत्काळ अटक करावी

Arvind Sawant
अमेय खोपकर यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा निषेध नोंदवला असून, मुंबई पोलिसांनी अरविंद सावंत यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी देखील केली आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलिसांचा अपमान सहन करणार नाही. असं देखील खोपकर यांनी म्हटले आहे.
 
“शून्य कामगिरी परंतु कार्यकर्त्यांसमोर चमकोगिरी करणाऱ्या खासदार अरविंद सावंत यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. सणासुदीच्या या काळात कुठेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून सतत दक्ष असणारे आपले मुंबईचे पोलीस. बाप्पाचं सण निर्वघ्नपणे पार पडवा यासाठी पावसा-पाण्यात, उन्हात राबणारे पोलीस जेव्हा आता दमलेले आहेत, तेव्हा तुम्ही घाणेरडं राजकारण करत आहात?, अहोरात्र मेहनत करणारे २४ तास पोलीस घरी देखील गेलेले नाहीत आणि तुम्ही त्यांच्याशी तावातावाने बोलताय. हातवारे करतात, त्यांना बोट दाखवतात तुम्हाला पोलिसांची भीती राहिलेली नाही का? पोलिसांचा अपमान करणाऱ्या अशा खासदाराचा मी निषेध करतो. अरविंद सावंत यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी.” असं खोपकर म्हणाले आहेत.