सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (21:17 IST)

शिवसेनेच्या उपकाराची जाणीव ठेवा : अरविंद सावंत

Arvind Sawant
शिवसेना खासदार अरविंद सावंत शिवसेनेच्या उपकाराची जाणीव ठेवा म्हणत अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. “भाजपाचा राज्यात विस्तार आणि केंद्रात केलेले सहकार्य यामुळे शिवसेनेच्या उपकाराची जाणीव ठेवा”, असा सल्ला सावंत यांनी शाह यांना दिला आहे.
 
भाजपचं सगळं तसंच असतं,त्यांचं नुसतं मिशन असतं, आज काय लोटस मिशन, परवा काय दुसरं मिशन असतं. त्यामुळं मूळ प्रश्न गहाळ असतात. अनेक गोष्टींपासून ते दूर आहेत. जनतेच्या प्रश्नांपासून दूर आहेत, मराठी माणसांच्या अस्मितेपासून ते दूर आहेत.”, असं अरविंद सावंत म्हणाले.
 
शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका यांचं नातं दृढ आहे. कुणी कितीही वल्गना करुद्यात. बंगाल, पंजाब आणि दिल्लीत भूईसपाट झाले तेच मुंबईत होणार, मुंबईकर सूज्ञ आहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई महापालिका चालवते, ते उद्धव ठाकरेंच्या दूरदृष्टीमुळं सुरु आहे. पोठात एक आणि ओठात एक ही पद्धत कुणाकडे आहे याची कल्पना सर्वांना आहे. अमित शाह त्यावेळी हरियाणाला का गेले होते. महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाला होता. तुम्ही शब्द दिल्याचं उद्धव ठाकरे सांगत होते. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात न येता हरियाणाला गेलात. नंतर सहा महिन्यांनी बोलला होता ते गझनी सारखं असतं, असं अरविंद सावंत म्हणाले.