बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (08:56 IST)

रेकॉर्ड : मुंबईत १५ वर्षातील सर्वांत निचांकी ध्वनीप्रदुषणाची नोंद

मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गेल्या १५ वर्षातील सर्वांत निचांकी ध्वनीप्रदुषण नोंदवलं गेलं आहे. यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदुषण रोखण्याच्या हेतूने मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यास प्रतिबंध केला होता. त्याचाच परिणाम म्हणून यंदा फटाक्यांच्या आवाजाने होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची सर्वात निचांकी नोंद झाली आहे. आवाज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने याबाबत अहवाल तयार केला आहे. 
 
आवाज फाउंडेशनचे सुमैरा अब्दुलली म्हणाल्या, “यंदाच्या दिवाळीत मुंबई महापालिकेने फटाके उडवण्याबाबत कडक निर्बंध घातल्यानेच कमी डेसिबलची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये ध्वनी प्रदुषणाबाबत जागृती होत असल्याचे एक यामागे प्रमुख कारण आहे.” आवाज फाउंडेशनच्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ८ ते १० या वेळेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपर्यंतच्या शहरातील आवाजाची पातळी मोजण्यात आली. त्यानुसार, फटाके वाजण्याच्या वेळमर्यादेपर्यंत म्हणजेच रात्री १० वाजेपर्यंत शहरातील शांतता क्षेत्र असलेल्या शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात १०५.५ डेसिबल ध्वनीची नोंद झाली.