सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (08:38 IST)

ठरलं, हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार

राज्याचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अधिवेशनाचा कालावधी किती असावा याबाबतचा निर्णय १ डिसेंबर रोजी परिस्थीतीचा आढावा घेऊन ठरवला जाणार आहे. ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. 
 
भाजपचे आमदार गिरीष महाजन यांनी यांनी यावरुन सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'किमान १५ दिवस अधिवेशन व्हावे ही आमची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशन कालावधी कमी ठेवायचा, चर्चा फार करायची नाही अशी सरकारची भूमिका दिसते आहे. पळ काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपूरला व्हावे ही आमची मागणी होती.'