शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (16:28 IST)

मुंबईच्या टिळक नगर रेल्वे व्ह्यू इमारतीला आग लागली, सुटकेसाठी स्थानिकांचे प्रयत्न

मुंबईतील टिळक नगर येथील नवीन टिळक नगर रेल्वे व्ह्यू इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली. या दरम्यान अनेक लोक जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या बाहेर फ्लॅटच्या बाल्कनीत लटकत असताना दिसत आहे.आगीचे व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये लोक आपला जीव वाचवण्याची विनवणी करताना दिसत आहे.  
 
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीत अडकलेल्या लोकांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील टिळकनगर रेल व्यू कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटीमध्ये भीषण आग लागली आहे. 13 मजल्याच्या या इमारतीमध्ये दुपारी 12 व्या मजल्यावरील एका घरात आग लागली आणि नंतर ती भडकली. ही आग दुपारी 2.43 च्या सुमारास लागली. एमआयजीसोसायटीच्या 12 मजल्यांच्या फ्लॅटमध्ये आग लागली. अग्निशमन विभागाचे पथक, रुग्णवाहिका, पोलीस पथक आदी घटनास्थळी हजर आहेत. 
 
या आगीत अडकलेल्या एका महिलेला वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रयत्न केले. या आगीमुळं त्या इमारतीमध्ये लोक अडकले आहेत.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. ही इमारत 20 ते 25 मजली असल्याचे समजले आहे. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्याला आग लागली असून धुराचे लोट दिसत आहे.
 
Edited By - Priya Dixit