दहीहंडीतील जखमी गोविंदाचा मृत्यू
रोज सकाळी घरोघरी वृत्तपत्र वाटण्याचे काम, दुपारी महाविद्यालय आणि संध्याकाळी पिझ्झा डिलिव्हरीचे काम करणारा प्रथमेश सावंत दहीहंडीतील थरावरून पडून जखमी झाला होता त्याची मृत्यूशी चाललेली झुंज आज संपली आणि त्याचे निधन झाले.
दहीहंडी खेळणार्या गोविंदांना तात्काळ विम्याची सुरक्षा देणे शक्य नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी गोविंदांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मनोरे रचताना गोविंदा पथकातील खेळाडूचा दहीहंडीच्या थरावरून पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपये, दहीहंडीच्या थरावरून प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे 2 अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजारांची मदत, दहीहंडीच्या थरावरून पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास 5 लाख रुपयांची मदत यांचा समावेश आहे.