गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (09:50 IST)

गुजरातमध्ये गरबा खेळताना मृत्यू

garba
गुजरातमधील आनंद जिल्ह्यात गरबा खेळताना एका 21 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वीरेंद्र सिंगचा गरबा उत्साहाने भरला होता तेव्हाच तो गरबा खेळता खेळता खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर, आनंद येथील शिवशक्ती सोसायटीत ही घटना घडली आहे.  
 
तारापूरच्या शिवशक्ती सोसायटीत नवरात्रीनिमित्त 9 दिवस सोसायटीत गरब्याचे आयोजन केले जाते. 30 सप्टेंबर रोजी 21 वर्षीय वीरेंद्र सिंह राजपूत गरबा खेळत होता. यादरम्यान त्याचे मित्र व्हिडिओ बनवत होते. त्यानंतर अचानक वीरेंद्र खाली पडला. सोसायटीतील लोकांनी त्याला घाईघाईत रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच वीरेंद्रचा मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Edited by : Smita Joshi