गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (16:35 IST)

Bihar गृहपाठामुळे विद्यार्थ्याला मरेपर्यंत मारहाण

बिहारमध्ये गयाच्या एका शाळेत एका शिक्षकाने गृहपाठ न केल्यामुळे विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा  शाळेच्या याच वसतिगृहात राहत असून तिसरीच्या वर्गात शिकत होता. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी हा बालक शाळेच्या गेटबाहेर बेशुद्धावस्थेत पडलेला आाढळला. त्याचा संपूर्ण चेहरा सुजला होता. त्याच्या नाकातून रक्त वाहत होते. गणवेशही फाटलेला होता. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
 
पीडित मुलगी वजीरगंज-फतेहपूर रस्त्यावरील बधी बिघा गावाजवळील लिटल लीडर्स पब्लिक स्कूलमध्ये शिकत होता. त्याचे घर शाळेपासून तीन किमी अंतरावर होते, त्यामुळे घरच्यांनी त्याला शाळेच्या वसतिगृहात ठेवले होते. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी शाळेबाहेर एकच गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी शाळेचे संचालक विकास सिंह याला अटक केली. 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर शाळाही बंद करण्यात आली आहे. सर्व मुलांना वसतिगृहातून घरीही पाठवण्यात आले आहे. 
 
Edited by : Smita Joshi