गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (08:07 IST)

सांगलीत महाविद्यालयीन युवकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून

murder
कर्नाळ रोड परिसरात राहण्यास असलेल्या महाविद्यालयीन युवकाचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. अजित बाबुराव अंगडगिरी (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. तिघांनी पूर्ववैमनस्यातून त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास म्हसोबा मंदिर ते माधवनगर रोडवर ही घटना घडली.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत अजित हा कर्नाळ रोडवरील एका हॉटेलजवळ कुटूंबियांसह राहण्यास होता. याच ठिकाणी त्याच्या वडीलांची पानपट्टी आहे. तर अजित हा सांगली शहरातील एका महाविद्यालयात कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याला फोटोग्राफीची आवड होती.
 
अंगडगिरी कुटूंबियाने पदमाळे फाटा येथील म्हसोबा मंदिर ते माधवनगर रोडवर असलेले एक शेत कसण्यास घेतले आहे. बुधवारी दुपारी मयत अजित त्याची आजी व इतर महिलांसह शेतात मशागतीचे काम करत होता.