सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (22:13 IST)

पाय घसरून तलावात पडल्याने ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

death
गोंदिया- खेळता- खेळता पाय घसरून तलावात पडल्याने ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. शहरातील छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळील तलावात गुरुवारी (दि.२२)  ही घटना घडली.
 
कुंजू लुकेश पटले (३) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कुंजू हा परिसरातील लहान मुलांसोबत खेळत असताना त्याचा पाय घसरून तो तलावात पडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सोबत खेळत असलेल्या मुलांमध्ये गोंधळ उडाला. यातील एका मुलीने त्याच्या घरी जाऊन सदर घटना सांगितली, घरच्यांनी लगेच अग्निशमन पथकाला माहिती दिली.
 
अग्निशमन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुंजूला लगेच तलावातून बाहेर काढले व डॉ. गिरी यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र त्यांनी डॉ. आरती पटले यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. डॉ. पटले यांच्या दवाखान्यात नेले असता त्यांनी तपासणी करून कुंजूला मृत घोषित केले.