शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. नवरात्रि 2022
  3. नवरात्रि उत्सव
Written By
Last Updated : शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (09:32 IST)

Nawratrotsava Naina Devi Mandir:नैना देवी चे चमत्कारिक मंदिर,नवसाला पावणारी देवी, या नवरात्रोत्सवात भेट द्या

Naina Devi Mandir: नैनितालमध्ये नैना देवी मंदिर शक्तीपीठात समाविष्ट आहे आणि असे मानले जाते की येथे देवीचे दर्शन घेतल्याने डोळ्यांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
 
नैनितालमधील नैनी तलावाच्या उत्तरेकडील तटावरील नैना देवी मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि 1880 मध्ये भूस्खलनाने नष्ट झाले होते, परंतु नंतर ते पुन्हा बांधण्यात आले. या देवीच्या मंदिराचा शक्तीपीठात समावेश करण्यात आला असून त्यामुळे येथे देवीचे चमत्कार पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने भाविक नयना देवी मंदिराला भेट देतात आणि आपल्या मनातील इच्छा त्यांच्यासमोर ठेवतात. इथल्या देवीच्या दर्शनाने लोकांच्या डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात, अशी आख्यायिका आहे. आणि लोकांचा विश्वास देखील आहे. 
 
देवी सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव त्यांना  कैलास पर्वतावर घेऊन जात असताना देवीचा एक डोळा नैनितालमध्ये पडला होता, तर दुसरा डोळा हिमाचलच्या बिलासपूरमध्ये पडला होता. त्यामुळेच या देवीच्या मंदिराचा शक्तीपीठात समावेश करण्यात आला आहे. देवीच्या शरीराचा भाग जिथे पडला तिथे शक्तीपीठ स्थापन झाल्याचा उल्लेख पुराणात आहे. यामुळे नैनितालच्या नैना देवी मंदिराचा 64 शक्तीपीठांमध्ये समावेश आहे. नयना देवी मातेला या मंदिरात दोन डोळे आहेत. यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या येथे दूर होतात. त्याचबरोबर ही देवी नवसाला पावणारी आहे. येथे भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मंदिरात नयना देवीसह गणेश आणि माँ काली यांच्याही मूर्ती आहेत.
 
मंदिराच्या प्रवेशद्वारावर पिपळाचे मोठे व घनदाट झाड आहे. येथे नयना देवी हे पार्वतीचे रूप मानले जाते आणि म्हणूनच तिला नंदा देवी असेही म्हणतात. नंदा अष्टमीच्या दिवशी मंदिरात भव्य जत्रेचे आयोजन केले जाते, जी 8 दिवस चालते आणि येथे लांबून लोक येतात. हे मंदिर नैनिताल मुख्य बसस्थानकापासून फक्त 2 किमी अंतरावर आहे.
 
नैनी तलावाचे महत्त्व जाणून घ्या
नैना देवी मंदिराप्रमाणे नैनी तलाव देखील अतिशय पवित्र मानला जातो. एका पौराणिक कथेनुसार, जेव्हा ऋषी अत्री, पुलस्त्य आणि पुलह यांना नैनितालमध्ये कुठेही पाणी सापडले नाही तेव्हा त्यांनी एक खड्डा खणून तो मानसरोवरच्या पाण्याने भरला. तेव्हापासून येथे पाणी कधीच कमी झाले नाही आणि ते तलाव बनले. स्कंद पुराणात याला त्रिऋषी सरोवर असेही म्हणतात. मानसरोवर नदीत स्नान केल्यासारखे पुण्य तलावात स्नान केल्याने मिळते, असे मानले जाते.
मंदिराच्या दरवाजातून प्रवेश करताच भाविकांना हनुमानजी आणि गणपतीचे दर्शन होतात. मंदिरात महाकाली, नैनादेवी गणेशजींची पूजा प्रामुख्याने केली जाते.
 
मंदिर टेकडीवर वसलेले असून वळणाच्या रस्त्यावरून जावे लागते. मुख्य ठिकाणी जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढून जावे लागते. येथे इलेक्ट्रिक कारची सुविधाही उपलब्ध आहे.
 
मंदिराची वेळ-
नैना देवी मंदिरात जाण्याची योग्य वेळ सकाळी 6ते रात्री 9
 
नैना देवी मंदिरात कसे जावे -
विमानाने -सर्वात जवळचे विमानतळ चंदीगड आहे, येथून मंदिराचे अंतर सुमारे 100 किमी आहे.
 
रेल्वेने -जवळचे रेल्वे स्टेशन आनंदपूर साहिब आहे. येथून मंदिराचे अंतर 30 किमी आहे.
 
रास्ता मार्ग -हे मंदिर राष्ट्रीय महामार्ग 21 ला जोडलेले आहे. चंदीगड किंवा आनंदपूर साहिब येथून टॅक्सीही भाड्याने घेऊ शकता.