गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (15:27 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

eknath shinde
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवाला धोका असून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिंदे यांना आत्मघातकी हल्ला करून मारण्याची धमकी मिळाली आहे. गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहे. 

आत्मघातकी स्फोट घडवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कट रचण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असून. या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग सतर्क झाला असून संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरक्षा अधिक वाढविण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना जीवे मारण्याच्या धमकीच पत्र आलं होत. तसेच त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा निनावी फोन देखील आलेला. त्यांना पूर्वी माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असून आता पुन्हा आत्मघातकी स्फोटाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून गुप्तचर विभागाला माहिती मिळाली आहे. पोलीस विभाग सतर्क झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit