बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (21:56 IST)

भुजबळ यांनी दिले स्पष्टीकरण म्हणाले ..टेकचंदानी यांच्यासोबत माझा काहीही संबंध नाही

chagan bhujbal
टेकचंदानी यांच्यासोबत माझा काहीही संबंध नाही. त्यांचा नंबर देखील डिलिट केला आहे. परंतु तो सतत मला मेसेज करून त्रास देत होता, म्हणून मी सदर नंबर तपासण्यासाठी कार्यकर्त्याला सांगितले. पुण्याच्या कार्यकर्त्याने त्याला विचारले तू भुजबळांना का त्रास देतो. त्यावेळी त्यांनी सांगितले समोर येऊन चर्चा करू,असेही सांगितल्या चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. याआधी भुजबळ यांच्याविरोधात चेंबूर पोलिसांनी  एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर आता भुजबळांनी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी भुजबळ म्हणाले की, तक्रारदार टेकचंदानी आणि आपल्यात मागील दहा वर्षांपासून वैर आहे. त्यांनी 2014 ते 2019 च्या काळात आमच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. यातील काही प्रकरण सुटत आहेत. मात्र, काहींना आम्ही अद्याप तोंड देत आहोत, असे त्यांनी सांगितले. 
 
पुढे ते म्हणाले की, 'मी त्याला कधीही फोन केला नसून दुसऱ्याने त्याला फोन केला. मात्र त्याने तो उचलला नाही. जे काही झाले ते चॅटिंगवर झाले. ते कार्यकर्त्यासोबत आहे. पण त्यात देखील मी धमकी दिलेली नाही, मी बोललो देखील नाही. पण हे जे काही सुरू आहे ते या सरस्वती वादाचा फायदा घेत त्याने केले आहे. हे जे काही घडले त्याबद्दल मी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
 
तसेच या प्रकरणाची चौकशी करावी. मी जर त्यांच्या सोबत बोलत नाही तर त्याने मला का त्रास द्यावा. 'छगन लाल चिकी खाय बिकी खाय' असे मेसेज मला का करावे. मी त्याच्याशी कधीही बोललो नाही त्याच्याकडून मला त्रास दिला गेला. सारखे सारखे मला त्याने निगेटिव्ह मेसेज केले. तो व्यक्ती अगोदर मुंडे साहेब यांच्याकडे होता. त्यानंतर आमच्या सोबत काम केले आहे, असा खुलासाही भुजबळांनी केला.

Edited - Ratandeep Ranshoor