रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (22:00 IST)

भाविकांच्या कारला अपघात दोन ठार, पाच जखमी

accident
औरंगाबादतील चित्ते पिंपळगाव येथील मोहटादेवीच दर्शन करून येणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात होऊन दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद -बारामती मार्गावर पार्थडी तालुक्यातील काळेगाव शिवारात घडली आहे. देवीचं दर्शन घेऊन अमरापूरकडून येणाऱ्या वाहनाने भाविकांच्या कारला धडक दिल्याने अपघात झाला आणि त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच अपघातात जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे. 

Edited By - Priya Dixit