सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (23:24 IST)

आता हॅलो नाही वंदे मातरम म्हणावं, अभियानाला 2 ऑक्टोबर पासून शुभारंभ

sudhir mungantiwar
उद्या 2 ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती निमित्त देशात अनेक उपक्रम राबविले जातात. आता राज्यात देखील गांधी जयंती निमित्त हॅलो नव्हे तर वंदे मातरम अभियानाचे शुभारंभ होणार आहे. वर्धा येथून या अभियानाचे शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून त्यासाठीचे जनतेला आवाहन करण्याचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागातून प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच राज्यभरात हे अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याने यशस्वी होण्याचे ते म्हणाले. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वंदे मातरम या शब्दांनी दूरध्वनीतील संभाषणाची सुरुवात व्हावी जेणे करून राष्ट्रीय स्वरूपाची जाण होईल. अशी जनसामान्यांची इच्छा होती. जनसामान्यांच्या इच्छेला मान देऊन हे अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला. हे अभियान नक्कीच यशस्वी होईल असे ते म्हणाले.     

Edited By - Priya Dixit