बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 14 डिसेंबर 2024 (15:49 IST)

कुर्ला बस अपघातानंतर महापालिकेची कारवाई, सर्व फेरीवाले हटवले

bheed
मुंबईत कुर्ला बस अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला.या अपघातानंतर कुर्ला बेस्ट महापालिकेने कडक कारवाई करत स्थानका जवळील 150 मीटर पर्यंतच्या फेरीवाल्याना परिसरातून हटवण्यात आले आहे. या बाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही अनेकदा फेरीवाल्यांवर कारवाई करतो मात्र ते पुन्हा येऊन बसतात. लोक म्हणतात की हे फक्त काही दिवसांसाठी आहे. काही दिवसांनंतर फेरीवाले पुन्हा येऊन बसतात. अपघातापूर्वी स्थानकाच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांनी अधिपत्य गाजवले आहे. बेस्टच्या बस ला देखील अनेकदा अडचणीचा सामना करावा लागला आहे. 
 
शेअरिंग ऑटो स्टँड आणि इतर वाहनांची ये-जा यामुळे संपूर्ण रस्ता जाम झाला होता. स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऑटो स्टँड आहेत, जवळच शाळा आहे, त्यामुळे लोकांना चालणे कठीण झाले आहे. याबाबत महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र कोणीही तोडगा काढत नव्हता. मात्र बस अपघातात सात जणांना जीव गमवावा लागल्यानंतर महापालिकेने कारवाई करत फेरीवाले हटवले.
Edited By - Priya Dixit