शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (13:02 IST)

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात, थोडक्यात बचावले

accident
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात पनवेल जवळ पहाटे साढे पाचच्या सुमारास झाला आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर त्यांच्या बीएमडब्ल्यू कार आणि एसटीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने ते बचावले. ते आपल्या कार मधून मुंबईच्या दिशेने येत असताना रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. एसटी बस आणि त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली आणि कार चक्काचूर झाली. चारही एअरबॅग्स उघडण्यात आल्या. 
 
अपघातानंतर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही  कार चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.