1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. no flight will operate from Mumbai to Navi Mumbai Airport

'मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर विमानसेवा हलवली जाणार नाही', मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला लिहले पत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर कोणतीही विमानसेवा हलवू नये, अशी मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर कोणतीही विमानसेवा हलवली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून ही मागणी केली आहे. सूत्रांनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणतीही विमानसेवा हलवली जाणार नाही.
माहितीनुसार मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर कोणतीही विमानसेवा (उड्डाणे) हलवली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुंबई विमानतळावरून १४ आंतरराष्ट्रीय शहरांची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा प्रस्ताव होता. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध दर्शवला असून, त्यांनी यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

दोन्ही विमानतळ स्वतंत्रपणे चालतील
मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही विमानतळ आपापल्या क्षमतेनुसार स्वतंत्रपणे कार्यरत राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। मुंबई विमानतळावरील टर्मिनल-१ च्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी आधी टर्मिनल-१B उभारण्याचा आणि त्यानंतर १A वरील उड्डाणे १B मध्ये हलवण्याचा पर्यायी प्रस्ताव दिला आहे.
पुढील लेख
LIVE: मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर कोणतीही विमानसेवा हलवली जाणार नाही