बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (19:45 IST)

आता 24 तास 'बेस्ट' सेवा

lalpari
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बेस्टद्वारे आजपासून 24 तास सेवा दिली जाणार आहे. मध्यरात्रीपासून ते पहाटे 5 पर्यंत मुंबईमधील 6 मार्गावर बेस्ट बस धावणार आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे रात्री उशीरापर्यंत काम करणार्‍या मुंबईकरांसाठी सुरक्षित आणि स्वस्त सार्वजनिक सेवा देण्याचा प्रयत्न बेस्टमार्फत यापुढे केला जाणार आहे. हा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. रात्रीच्या वेळेस कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.