बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (17:36 IST)

राऊत, खडसे यांचे फोन टॅप, रश्मी शुक्लावर गुन्हा दाखल

rashmi shukla
महाराष्ट्रात फोन टॅपिंगचा  विषय परत एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  आणि माझे फोन टॅप होत होते. त्याबद्दल कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत  यांनी सांगितले. गोव्यात सुदिन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जात आहे, असे आरोप त्यांनी केला.
 
संजय राऊत यांनी सांगितले की, भाजप राज्यपाल, केंद्रीय तपास यंत्रणा आणि फोन टॅपिंगच्या माध्यमातून गोव्यात सत्ता आणण्याचा प्रयत्नात आहे. मात्र, ते शक्य नाही. त्यामुळे भाजपने आता केजीबी आणि सीआयए या संस्थांनाही मदतीसाठी घ्यावी. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे गोवा विधानसभा निवडणुकीतील भाजपचे प्रभारी होते. त्यांनी गोव्यात ‘महाराष्ट्र पॅटर्न’ राबवत विरोधकांचे फोन टॅप काम सुरु केले आहे. दोन दिवसांपूर्वी मला काँग्रेसचे नेते दिगंबर कामत भेटले होते. त्यांनी आपला फोन टॅप होत असल्याची शंका व्यक्त केली.