मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (19:09 IST)

मुंबईतील शाळा उद्यापासूनच सुरू होणार

Omicron: Schools in Mumbai will start from tomorrow Omicron : मुंबईतील शाळा उद्यापासूनच सुरू होणारMarathi Mumbai News In Webdunia Marathi
मुंबईतील शाळा उद्यापासूनच सुरू होणार असल्याचं मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजू तडवी यांनी सांगितलं. याबाबतचे आदेश काढण्यात आलेत. शाळेबाबत कुठलाही संभ्रम बाळगू नका असं या आदेशात म्हटलं आहे. मुंबईतील शाळा उद्यापासून म्हणजेच 15 डिसेंबरपासूनच सुरू होणार, विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी मनात संभ्रम बाळगू नये असं म्हटलं आहे. शाळांना महापालिकेकडून सूचना देण्यात आले आहेत. 40% पालकांनी शाळांना संमती पत्र दिलंय. शिक्षण विभागाकडून सूचना आली तरच आयुक्त हे शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार करू शकतात. अशा प्रकारची सूचना आलेली नाही त्यामुळे शाळा उद्या सुरू होतील .शाळांना पुरेसा वेळ मिळाला आहे त्यामुळे शाळांची सुद्धा तयारी झाल्याची माहिती आहेजर पालकांना शाळेत पाठवायचे नसेल तर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय असणार आहे ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे.
महाराष्ट्रातील शाळा एक डिसेंबर पासून सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेनं हे स्पष्ट केले होतं की मुंबईत पहिली ते सातवीच्या मुलांच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होतील.
दरम्यान पुण्यात शाळा सुरू करायची की नाही याबाबत महापौर, आयुक्त यांची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. मंगळवारी संध्याकाळ पर्यंत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
खरंतर याआधीच महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या सर्व शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दक्षिण अफ्रिकेतून 'ऑमिक्रॉन' या नव्या कोरोना व्हेरियंटची माहिती समोर आल्यानं अनेकांच्या मनात साशंकता होती.
नव्या व्हेरिएंटचे रुग्ण दक्षिण अफ्रेकेसह आतापर्यंत बोत्स्वाना, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि इंग्लंडमध्ये आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या नव्या व्हेरियंटला 'Variant of Concern' म्हणजेच 'काळजी करण्याजोगा व्हेरियंट' म्हटलंय.
 
अशी आहे नियमावली -
* दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतो किमान 6 फूट अंतर ठेवावे
* शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणं बंधनकारक आहे.
* वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी
* शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
* शाळांमध्ये बायोमेट्रिक अटेंडंसचा अवलंब करू नये
* शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम , खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात
* ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास परवानगी
* विद्यार्थी किंवा शिक्षक आजारी असल्यास त्यांनी शाळेत येऊ नये ,आवश्यक नियमांचं पालन करावं.
* क्वारंटाइन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी.
* शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोना बाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा
* शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे
* शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नयेयामध्ये * ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.
* एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशा प्रकारे नियोजन करावे. विद्यार्थी संख्या जास्त असल्यास शाळा दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी.
* शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे. 
* शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात
* पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल.