सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (22:28 IST)

लाईमलाईटमध्ये असलेल्या लोकांना भिती का वाटत नाही ? महापौर पेडणेकर यांचा सवाल

ओमिक्रॉन वाढत राहिल्यास राज्यांवर निर्बंध लादण्यात येणार असल्याचं पीएम मोदींनी सांगितलं. परंतु लाईमलाईटमध्ये असलेल्या लोकांना भिती का वाटत नाही. असा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडवण्यात आला. तसेच येथील मॅनेजमेंटला देखील फोन करण्यात आला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींना ट्रेसिंग केलं आहे. दोघांचेही कॉन्टॅक्ट चेक केले जात आहेत. घरी क्वारंटाईन होऊ असं सांगण्यात आलंय. घरी क्वारंटाईन करण्यात आलं असून मुंबईची महापालिका सुद्धा सज्ज आहे. परंतु बॉलिवूड सह राजकीय लोकांनी सुद्दा काळजी घेतली पाहीजे. असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
राजकीय, बॉलिवूड आणि इतर लोकांनीही जर काळजी घेतली नाही. तर मृत्यूचा धोकाही ओढावण्याची शक्यता असते. ग्रँड हयात पार्टीमध्ये काही प्रसिद्ध मुलांची नावे समोर आली आहेत. परंतु त्यांनी देखील स्वत:ची आणि घरातील लोकांची काळजी घेतली पाहीजे असं पेडणेकर म्हणाल्या.