मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (15:12 IST)

कोरोनाची अँटीजन टेस्ट केवळ नऊ रुपयात, मुंबई महापालिका चाचण्यांचे 20 लाख कीट घेणार

राज्यात कोरोना संक्रमणचा पुन्हा धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोनाची अँटीजन टेस्ट केवळ नऊ रुपयांत करण्यात येणार आहे. याचा अहवाल अर्ध्या तासात मिळणार आहे.
 
मुंबई महापालिका अँटीजन चाचण्यांचे 20 लाख कीट घेणार आहे. एका चाचणीचा केवळ 9 रुपये दर असणार आहे. केवळ अर्ध्या तासातच चाचणीचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेचा अँटीजन चाचण्यांसाठी प्रस्ताव ठेवला आहे. दक्षिण आफ्रिका, युरोप या देशांमध्ये थैमान घालणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे आतापर्यंत दोन बाधित रुग्ण मुंबईत आढळून आलेत. तरीही खबरदारी म्हणून महापालिकेनं कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्यासाठी 20 लाख अँटीजन चाचण्यांचे कीट खरेदी केले जाणार आहेत.