शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (12:38 IST)

पोटच्या 10 दिवसाच्या बाळाला 50 हजारासाठी विकलं

Mother arrested for selling baby for Rs 2.5 lakh in Mumbai
मुंबई- पोटच्या 10 दिवसांच्या बाळाची विक्री करणाऱ्या आईला आणि चार दलालांना एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. बाळाची अडीच लाख रुपयांना विक्री ठरली होती. पोलिसांनी आरोपीला बनावट गिर्‍हाईक बनून आरोपींना रंगेहाथ अटक केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.
 
आरोपी आई रहीम शेख हिने चार मुलांना जन्म दिला होता. पतीपासून विभक्त झाल्यामुळे त्यांच्या पाच मुलांचा सांभाळ करण्याचा प्रश्न तिला भेडसावत होता. तिने पाचवे अपत्य म्हणून मुलीला जन्म दिला. तिने आपल्या पाचवे मुल विकण्याचा निर्णय घेतला. तिने मूल विकणाऱ्यांचा शोध काढला आणि चार लोकांची चेन तयार केली.
 
बाळ कोण विकणार, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यांनी अनाथाश्रमात येणाऱ्या लोकांना हेरायचे ठरवले. अनाथाश्रमातील मुलांच्या मदतीसाठी आलेल्या अमृता गुजर शेख यांना मुलाची विक्री केल्याची माहिती आरोपींनी दिली. एका आरोपीने फिर्यादीला योग्य प्रक्रियेशिवाय मुलाची विक्री करण्याचा अधिकार देऊ केला होता. जागरूक महिला तक्रारदार अमृता गुजर शेख यांनी मुलाची विक्री झाल्याची माहिती मिळताच एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 
 
पोलिसांनी स्वत: बनावट गिऱ्हाईक बनून बाळ विकत घेण्याचा सापळा रचला. पाच आरोपींनी प्रत्येकी 50 हजार रुपये ठरवून 2.5 लाख रुपयांना बाळ विकण्याचे ठरवले होते. नेरुळ रेल्वे स्थानकाशेजारी बाळ विकत घेण्यास बोलविण्यात आले तेव्हा रोख 50 हजार स्विकारून बाळाची विक्री करणारी आरोपी माता रहीम शेख आणि इतर चार मध्यस्थी एजंटला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. सध्या बाळ भिवंडी येथील बाळ कल्याण समितीकडे देण्यात आले आहे.