रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: भिवंडी , मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (10:44 IST)

भिंवडीत Selfie बेतली जीवावर

सेल्फीच्या नादात भिवंडीत एका 13 वर्षीय मुलाने आपला जीव गमावला आहे. इमारतीवरुन पडून त्याचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा येथे ही घटना घडली आहे. या परिसरातील हिना मार्केट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावरून खाली पडल्याने एका 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद उबेद शेख असे जीव गमावलेल्या मुलाचे नाव आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 
दरम्यान सदरची हिना मार्केट ही तळ अधिक दोन मजली इमारत महानगरपालिकेने अनधिकृत ठरवीत कारवाई करीत अर्धवट इमारत तोडून ठेवली आहे. पडीक झालेल्या या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर परिसरातील मुले खेळण्यासाठी जात असून यापूर्वी सुद्धा काही अपघात झाल्याचे बोलले जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद उबेद शेख हा सेल्फी काढण्यासाठी इमारतीच्या छतावर किनारी उभा होता.